Triangulation
Icon Triangulation

Triangulation

by Microdynamic Software

Triangulation कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण मोजमाप करण्यात मदत करते.

App NameTriangulation
DeveloperMicrodynamic Software
CategoryEducation
Download Size10 MB
Latest Version1.0.4
Average Rating0.00
Rating Count0
Google PlayDownload
AppBrainDownload Triangulation Android app
Screenshot Triangulation
Screenshot Triangulation
Screenshot Triangulation
Screenshot Triangulation
Triangulation हे ॲप कोणत्याही प्रकारची मोजणी प्रकरण हाताळणे कामी सर्व्हेअरला आकडेमोड करण्यासाठी मदत करते.

महत्वाचे मुद्दे:

जंत्री:
यामध्ये ब्रिटिश मापनाचे मेट्रिक मापनात अचूक रुपांतर होते. यात ३३, ४१.७५, ६६ फुटांची १६ आण्यांची जंत्री उपलब्ध आहे.

एकर गुंठयाचे हेक्टर आर मध्ये तसेच हेक्टरचे एकर गुंठ्यांत रूपांतर व बेरीज मिळते.

एनलार्जमेंट:
कोणत्याही स्केलवर असणाऱ्या नकाशाचे आपणास हव्या त्या स्केलवर आकृती तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो तसेच आपणाकडे उपलब्ध नकाशा अभिलेखावरील क्षेत्रफळाशी मेळात ठेवून किती पट करावयाचा आहे ते सांगते.

आकारफोड :
भुसंधान प्रकरणामध्ये आकडेफोड करणेकामी याचा उपयोग होतो.

टिपनाचे क्षेत्रफळ काढणे:
साखळी आण्याचे मीटरमध्ये रूपांतर न करता टिपनाचे क्षेत्रफळ तसेच बांधमाप मिळते.

नकाशाचे स्केल शोधणे:
आपल्याकडे उपलब्ध नकाशावरती स्केल नमूद नसल्यास तो नकाशा कोणत्या स्केलवर आहे हे सांगते.

त्रिकोणाद्वारे क्षेत्रफळ काढणे:
कोणत्याही आकाराच्या क्षेत्राचे किंवा नकाशाचे त्रिकोणात रूपांतर करून त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची मापे नमूद केल्यास अचूक क्षेत्रफळ मिळते.

वसलेवार पद्धतीने क्षेत्रफळ काढणे:
कोणत्याही स्केलवर असलेल्या नकाशाचे वसले पाडून मापे नमूद केल्यास अचूक क्षेत्रफळ मिळते.

७/१२ आणेवारी:
ब्रिटिश मापणातील ७/१२ आणेवरीचे हेक्टर आर चौ. मी. मध्ये अचूक रूपांतर मिळते.

Triangulation हे ॲप ब्रिटिश मापनाचे मेट्रिक मापनात रूपांतर करते.
याद्वारे आपणास अचूक निरीक्षणे नोंदवल्यास अचूक उत्तर मिळते.

For more information call us on:

📞9511841374
📞9766846506
Please mail your suggestion on
✉️[email protected]

More apps from the developer

Related Apps

More Apps like Triangulation