MyEduSoft
Icon MyEduSoft

MyEduSoft

by Compnet Info-Tech

मायएज्युसॉफ्ट.... कठीण परीक्षांची सोपी तयारी

App NameMyEduSoft
DeveloperCompnet Info-Tech
CategoryEducation
Download Size24 MB
Latest Version1.1.9
Average Rating4.23
Rating Count105
Google PlayDownload
AppBrainDownload MyEduSoft Android app
Screenshot MyEduSoft
Screenshot MyEduSoft
Screenshot MyEduSoft
Screenshot MyEduSoft
विद्यार्थी मित्रांनो, आपण नेहमी अभ्यास करतो म्हणजे अभ्यास मेंदूत साठवण्यासाठी परिश्रम करतो परंतु साठवलेला अभ्यास आठवण्याचा सरावच करत नाही. कमी सराव असल्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये उत्तरे आठवत नाहीत. आपल्या देशातील परीक्षा या स्मरणशक्तीवर आधारित आहेत, त्यामुळे स्मरणशक्ती बळकट करणे हा अभ्यासाचा महत्वाचा भाग आहे. आपण किती वेळ अभ्यास करतो याबरोबरच केलेला अभ्यास आपल्याला किती आठवतो यावर आपला निकाल अवलंबून असतो.
शिकविणारे शिक्षक, पुस्तके, गाईड्स, त्या परिसरातील कोचिंग क्लास, परीक्षेचा पेपर, व प्रत्येकाकडे तयारीसाठी असणारा वेळ या सगळ्या गोष्टी एकाच वर्गातील मुलांसाठी एकसारख्याच असल्या तरी परीक्षेत मिळणारे मार्क्स मात्र प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. केवळ शाळा-कॉलेजात शिकवणारे शिक्षक, कोचिंग क्लासेस वा गाईड्स/नोट्स यांवरती आपले मार्क्स संपूर्णपणे अवलंबून नसतात. स्वयंअध्ययन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (स्मरणशक्तीचा सराव) याशिवाय परीक्षेची तयारी अपूर्णच. याचसाठी मायएज्युसॉफ्ट खात्रीशीरपणे परिपूर्ण मार्क्स मिळविण्याकामी येते.
मायएज्युसॉफ्ट या अॅप्लीकेशनमध्ये तुमच्या अभ्यासातील प्रत्येक धड्यामधील प्रत्येक ओळींवरती बहुपर्यायी प्रश्न दिले आहेत. ज्यामुळे तुम्हाला स्वतःचे मूल्यमापन सातत्याने करता येते. आज शिकविलेला सिलॅबस आपल्याला पूर्णपणे आकलन झाला आहे की नाही ते त्याच दिवशी समजते. चेकिंग मोबाईलमध्येच ऑटोमॅटिक होत असल्याने निकाल सेकंदातच समजतो. मिळालेल्या मार्कांबरोबरच कोणत्या प्रश्नांची उत्तरे चुकली व चुकलेल्या उत्तरांचे बरोबर पर्याय काय आहेत तेसुद्धा मॉडेल अॅन्सर्समुळे लगेचच समजते.

मायएज्युसॉफ्ट अॅप्लीकेशनची वैशिष्ट्ये :
• सर्व विषय समाविष्ट.
• प्रत्येक ओळीवर प्रश्न.
• फक्त एका Click मध्ये Result.
• पूर्ण वर्षाचे Results Save राहतात त्यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती समजते.
• प्रत्येक प्रकरणांचे सविस्तर व महत्वाचे सारांश.

उपलब्ध मायएज्युसॉफ्ट अॅप्लीकेशन्स :
• ५वी ते १०वी - मराठी, सेमी आणि इंग्रजी माध्यम.
• ११वी, १२वी सायन्स - Physics, Chemistry, Biology, Maths.
• MHT-CET and NEET.
• MPSC, स्कॉलरशीप, MTS, NTS, जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा.
• शासकीय नोकरभरती - रेल्वे, बँकींग, पोलीस, ग्रामसेवक, कृषी अधिकारी/सहाय्यक, तलाठी, इ.

Recent changes:
Result Problem Fix

Related Apps

More Apps like MyEduSoft